PAYAL BOOKS
Black Panther by Dr. Shridhar Pawar ब्लॅक पँथर
Couldn't load pickup availability
Black Panther by Dr. Shridhar Pawar ब्लॅक पँथर
डॉ. श्रीधर पवार हे ब्लॅक लिटरेचर आणि ब्लॅक पँथरचे गाढे अभ्यासक आहेत. १९६०च्या प्रारंभी जगभर प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध विद्रोह उसळला होता, याचाच परिणाम म्हणून १५ ऑक्टोबर १९६६ रोजी ऑकलँड शहरात बॉबी सील आणि एच. पी. न्यूटन यांनी ब्लॅक पँथर या नावाने क्रूरतेविरुद्ध लढा पुकारला. त्याचा आदर्श घेऊन वर्णवर्चस्ववादा विरुद्ध नामदेव ढसाळ व ज. वि. पवार या कवीमित्रांनी २९ मे १९७२ रोजी दलित पँथर या उग्रवादी चळवळीची सुरवात केली. ज्या ब्लॅक पॅंथरचे अनुकरण करून दलित पँथरने लढा देऊन इतिहास निर्माण केला, त्या ब्लॅक पँथरचा इतिहास मराठी माणसाला परिचित व्हावा अशी मी डॉक्टर पवार यांच्याकडे अपेक्षा केली होती. दलित पँथरच्या स्थापनेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष. या वर्षात ब्लॅक पँथरचा इतिहास उपलब्ध व्हावा याची पूर्तता झाली आहे. वर्णवर्चस्ववादाविरुद्ध लढणाऱ्या आंबेडकरी युवकांना हा इतिहास ऊर्जा देईल व या ग्रंथाचे स्वागत करतील ही अपेक्षा. - ज. वि. पवार दलित पॅंथरचे सहसंस्थापक
