Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Bhavishya Ghadavanari 100 Careers by Prof. Vijay Navale

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 399.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Bhavishya Ghadavanari 100 Careers by Prof. Vijay Navale

करिअर म्हणून निवडता येतील अशा १०० पदांविषयीची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न ‘भविष्य घडवणारी १०० करिअर्स’ या पुस्तकाच्या माध्यमातून प्रा. विजय नवले यांनी केला आहे. ‘करिअर FAQs’ आणि ‘माझी पदवी : माझे करिअर’ यांनंतरचे लेखकाचे हे तिसरे पुस्तक. आपल्या आजवरच्या दीर्घ अनुभवाचे सार लेखकाने प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून, करिअरबाबतचा निर्णय घेण्याच्या टप्प्यावर असलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या हाती ठेवले आहे. अकाउंटंटपासून अंतराळवीरापर्यंत आणि शेफपासून सर्जनपर्यंत बहुविध पदांचा विस्तृत आढावा ‘भविष्य घडवणारी १०० करिअर्स’मधून घेण्यात आला आहे. प्रत्येक पदाकरिता एक प्रकरण अशा पद्धतीने या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये त्या-त्या पदावरील व्यक्तीच्या प्रमुख जबाबदाऱ्या, तिला पदाबरोबर मिळणारे अधिकार, पदासाठीची आवश्यक कौशल्ये, परीक्षा आणि निवडप्रक्रिया, कामातील आव्हाने तसेच समाधानाचे मुद्दे, पुढील संधी, आदींचा समावेश करण्यात आला आहे. ‘कोणत्या स्वभावाच्या व्यक्तींना हे पद योग्य आहे?’ आणि ‘विद्यार्थ्यांनी आधीपासून कोणत्या सवयी विकसित कराव्यात?’ ह्या मुद्द्यांखाली देण्यात आलेली माहिती वाचून, संबंधित पदाचा करिअर म्हणून विचार करावा की नाही, याबद्दलची स्पष्टता वाचक विद्यार्थ्याला यावी, अशी अपेक्षा आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून प्रा. नवले यांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थांना मिळो आणि करिअरच्या वाटेवरचा त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने सफल होवो, ही सदिच्छा.