Bhatkaynche Lagna By Uttam Kamble
गावगाड्यातही ज्यांना सामावून घेतलं गेलं नाही, अशा
असंख्य भटक्या जाती आजही डोक्यावर फाटकं आभाळ
आणि पायांखाली दुभंगलेली जमीन घेऊन भाकरीच्या
तुकड्यासाठी गावोगाव फिरताहेत. या जातींचं एकूण
आयुष्यच न्यारं, रीतीरिवाज न्यारे, जात-पंचायत न्यारी,
सांस्कृतिक जीवन न्यारं आणि लग्नविधीसुद्धा!
लग्नविधींमध्ये जशी रंजकता आहे, तशीच प्राचीन
परंपरांची अनेक मुळंही रुजली आहेत. रस्त्यावर,
गटारीच्या काठावर, रानावनात आणि डोंगरदर्यांत
होणार्या या लग्नांतील परंपरा चक्रावून सोडणार्या, काही
मातृप्रधान संस्कृतीकडे बोट करणार्या, काही निसर्गाशी
नातं सांगणार्या, तर काही अमानवी आहे. स्त्रीला
लग्नकार्यात प्रतिष्ठा असली, तरी तिचं चारित्र्य शुद्ध आहे
की नाही, हे पाहण्यासाठी केली जाणारी योनिपरीक्षा किंवा
स्त्री ही एक वस्तू आहे, असं समजून तिचा केला जाणारा
लिलाव... सारंच काही धक्कादायक! विज्ञानाचा, ज्ञानाचा
स्फोट एकीकडे, तर दुसरीकडे आपल्या परंपरांना
गोंजारणारा समाज. वर्षानुवर्षं दिसणारं हे चित्र कधी
बदलणार?... कोण बदलणार?... आदी अनेक प्रश्नांचा
ऊहापोह करण्यासाठी ‘भटक्यांचे लग्नं’ हे एक निमित्त.