Payal Books
Bhatakanti By Heraman Hese Renuprasad Patki
Couldn't load pickup availability
Bhatakanti By Heraman Hese Renuprasad Patki
हेरमान हेसेच्या 'भटकंती' (मूळ जर्मन : Wanderung) या पुस्तकात त्याने इटलीच्या उत्तर भागात केलेल्या भटकंतीची वर्णनं येतात. निसर्ग आणि काही प्रमाणात दैनंदिन मानवी जीवनातील घटकांना केंद्रस्थानी ठेवून
लिहिलेल्या या वर्णनांना मुक्तचिंतनाचे स्वरूप प्राप्त होते. निसर्गदर्शनातून आत्मदर्शन हा या भटकंतीचा मूळ उद्देश आणि म्हणूनच या लेखांचे मुख्य सूत्र आहे, असं म्हणता येईल. हेसेला अपेक्षित असणारी भटकंती ही त्यामुळे तथाकथित अर्थाने भटकंती नाही, तसंच त्याला अपेक्षित असणारा भटक्या देखील तथाकथित भटक्यांपेक्षा वेगळा आहे. तो स्वतःच्या आणि जीवनार्थाच्या शोधात आहे. तो जीवनोत्सुक आहे, जीवनाच्या मूळ प्रक्रियेत त्याला रस आहे. आणि तो निसर्गनिरीक्षण आणि आत्मनिरीक्षण यांत भेद करत नाही. निसर्गाकडे परत जाण्याचा रस्ता हाच त्याच्यासाठी स्वतःपर्यंत पोहोचण्याचा रस्ता आहे. हेसेच्या या पुस्तकातील लेख वाचकाला निसर्गाची आणि निसर्गाच्या आपल्या आयुष्यातील स्थानाची नव्याने ओळख करून देतील आणि अंतर्मुख करतील.


