Payal Books
BHASHA HARAVELYA GAWASLELYA BAHARELYAAभाषा... हरवलेल्या... गवसलेल्या... बहरलेल्या... अरुण नेरूरकर
Couldn't load pickup availability
पक्षी प्राणी आणि मनुष्यप्राणी जन्माला आला त्या सोबतच त्याची त्याची म्हणून असणारी भाषाही जन्माला आली, फक्त तिचे स्वरूप त्या त्या जीवाला साजेसे होते. उदा. आवाज, स्पर्श, देहबोली इत्यादी. कारण 'संवाद' ही प्रत्येकाची निकड आहे. संदेश देणे आणि घेणे ही प्रत्येक जीवाला संवादासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक गरज असते/आहे.
भाषा हे त्या क्रियेचे त्याचे माध्यम होते. पक्षी व प्राणी यांच्या भाषेला मर्यादा ओलांडणे शक्य झाले नाही, परंतु मनुष्यप्राण्याने ते करून दाखवले आणि अनेक भाषा जन्माला आल्या, त्या विकास पावल्या बहरल्या, तर काही हरवून गेल्या. काही चिवटपणे टिकाव धरून राहिल्या. अक्षरे आली, शब्द आले, लिपी आली, त्याचे व्याकरण आले, कोश आले, विरामचिन्हे आली आणि भाषा शतकानुशतके विस्तार पावत गेली, मात्र कोणत्याही भाषेचे हरवून जाणे, मृत होणे वेदनादायी असते. जिवंत भाषा रसरशीतपणे संस्कृती, समाज, इतिहास आणि पर्यावरण रिचवत बहरून येते, फुलून येते व सर्वांना व्यापून दशांगुळे तरीही उरतेच!
श्री. अरुण नेरूरकर या सर्व क्रिया प्रक्रियेला कवेत घेऊन भाषेलाच एक नवी भाषा देतात, तिची नवी बोली शिकवू पहातात. मग त्यातून त्यांचा प्रत्येक लेख रोचक होत जातो. वाचनीय व भावस्पर्शी होतो. हे या पुस्तकाचे स्व-भाषिक' महत्त्व म्हणता येईल.
