शेतकऱ्याचा पोरगा राजा बनतो. स्वतः चिकाटीनं शिकून रयतेचा पोशिंदा होतो. अशा महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे हे संक्षिप्त चरित्र.
शिक्षण हेच परिवर्तनाचे आणि प्रगतीचे साधन आहे, हे हा राजा ओळखतो. हिंदुस्थानात प्रथमच सक्तीचे प्राथमिक मोफत शिक्षण सुरू करतो. लोककल्याणाची कामे, उत्तम प्रशासन, समान न्याय, शेतीउद्योगांना मदत करतो. सामाजिक सुधारणा, जाती-पातींच्या भिंती तोडून मानवता आणि समतेचा मार्ग दाखवितो.
सयाजीराव हे देशप्रेमी होते. स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांना त्यांनी एकट्याने हिमतीने आयुष्यभर मदत केली.
म. फुले, राजर्षी शाहू, ना. गोखले, म. गांधी, न्या. रानडे, लो.टिळक, सुभाष बाबू, डॉ. आंबेडकर, लजपतराय, पं. मालवीय, महर्षी शिंदे आणि कर्मवीर भाऊरावांसारख्या शेकडो व्यक्ती-संस्थांना सढळ हातानं त्यांनी मदत केली. हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन शिक्षण दिले. महाराष्ट्रातील बहुजनांच्या सर्व शिक्षणसंस्थांना पाठबळ दिले.
समता, बंधुत्व आणि मानवता धर्म हे या दूरदृष्टी पुरोगामी राजाचं वेगळेपण होतं. दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद शिकागोचे आणि अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांचे अध्यक्षपद भूषविलेले ते विचारवंत राजा होते. लेखक-कलावंतांना मदत केली.
जनकल्याणात मोक्ष पाहणारे हे भारताचे सुपुत्र होते. ते म्हणत, “बलसंपन्न भारत हे माझे स्वप्न आहे. त्यासाठी कष्ट, प्रामाणिकपणा, देशप्रेम आणि बंधुत्वातून ते घडेल.”
असा बलसंपन्न भारत आपल्याला घडवायचा आहे. ते स्वप्न पाहणाऱ्या भारताच्या सुपुत्राचे हे चरित्र समजून घेणे आजची गरज आहे.
Bhartache Putra Sayajirao Gaekwad | भारताचे पुत्र सयाजीराव गायकवाड by AUTHOR :- Baba Bhand
Regular price
Rs. 18.00
Regular price
Rs. 20.00
Sale price
Rs. 18.00
Unit price
per