Payal Books
Bharatiya Sanskruti - Vaishvik Mulyanchi Janani By L A Patil भारतीय संस्कृती : वैश्विक मूल्यांची जननी
Couldn't load pickup availability
Bharatiya Sanskruti - Vaishvik Mulyanchi Janani By L A Patil भारतीय संस्कृती : वैश्विक मूल्यांची जननी
हिंदू धर्म नसून संस्कृती आहे. हिंदू संस्कृती ज्ञानाचा स्रोत आहे. हिंदू संस्कृतीतील सहिष्णुतेमुळे खुलेपणाने जगण्याचे आणि मानवी मनाला जास्तीत जास्त शुद्ध करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक मूलभूत संकल्पनांची सुसंगत आणि तर्कशुद्ध मांडणी हिंदू संस्कृती करते. मानवाच्या सर्व प्रकारच्या अनुभवांचा अर्थ लावते आणि तत्त्वे मांडते. ब्रह्मसूत्रे, उपनिषदे, भगवद्गीता, न्याय-वैशेषिक दर्शन, योगदर्शन, अद्वैत वेदान्त, शुद्धाशुद्ध वेदान्त इत्यादी दर्शनांमध्ये वैश्विक मूल्ये मांडली आहेत.
भारतीय तत्त्वज्ञानामध्ये ज्ञान हे नि:श्रेयसाइतकेच योग्य मानले आहे. तत्त्वज्ञानाने व ज्ञानाने माणूस बंधमुक्त होतो आणि त्याला मोक्ष मिळतो असे हिंदू वैदिक संस्कृती मानते.
विश्वकल्याण व विश्वशांती साधावी आणि शिक्षित व अशिक्षित माणसांमध्ये श्रद्धेच्या नावाने खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात, या प्रामाणिक भावनेने विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून, विवेकनिष्ठ बुद्धीने आणि तत्त्वज्ञानरूपी भिंगातून हिंदू वैदिक संस्कृतीचा अभ्यास करण्याचा हा प्रयत्न आहे.
