Skip to product information
1 of 2

Payal Books

Bharatiya Naukanayanacha Itihas – भारतीय नौकानयनाचा इतिहास BY Dattatray Ketkar

Regular price Rs. 359.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 359.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
PULICATIONS

भारतीय नौकानयनाचा इतिहास हे पुस्तक प्राचीन काळ, मराठा आरमार व पेशवाईनंतरचा स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा काळ अशा तीन विभागात आहे.
वैदिक ग्रंथ, महाभारत,रामायण, जातककथा, मौर्यकाल, कौटिल्य अर्थशास्त्र अशा प्राचीन काळातील उल्लेख पहिल्या विभागात नोंदविले आहेत.
दुसऱ्या विभागात विजयनगर पाडावानंतर झामोरीन व त्याचे नौसेनानी, शिवाजी महाराजांची आरमार स्थापना, आंग्रे, धूळप यांचा उत्कर्ष व विनाश, शिवाजीमहाराजांची सागरी मोहीम, नौका बांधणी, आरमाराचा पगार या गोष्टी दिलेल्या आहेत.
इ.स.१८१८ मध्ये पेशवाईच्या शेवटानंतर ब्रिटिशांनी बॉम्बे मरीन्सची कशी वाढ केली, वाडिया मास्टर, सिंदिया स्टीम कंपनी व ब्रिटीश यांच्यातील संबंध, पहिल्या व दुसऱ्या महायुद्धातील भारतीय नौसैनिकांचा पराक्रम, मुंबई बंदरातील स्फोट व भारतीय नौसैनिकांचे बंड या इतिहासाने तिसरा विभाग संपन्न होतो. तसेच नौकानयनाच्या आधुनिक काळातील साधनांचा विकास या विभागाच्या शेवटी लेखक द. रा. केतकर यांनी दिलेला आहे