Bharatiy Sant Ani Samajik Samarasata भारतीय संत आणि सामाजिक समरसता by shyama Ghonase
भारतीय संत आणि सामाजिक समरसता
डॉ. श्यामा घोणसे
भारतीय संत आणि सामाजिक समरसता तीरा
'व्यक्ती आणि समाज यांच्या परिवर्तनाला गती देणारी, प्रतिकूलतेत आत्मबळ आणि अनुकूलतेमध्ये समतोलत्व प्रदान करणारी घटना म्हणजे 'ईश्वरी साक्षात्कार' होय', असे मानणाऱ्या नव्हे तर त्यावर प्रगाढ श्रद्धा असलेल्या 'ईश्वरनिष्ठांची मांदियाळी' अनेक शतके भारताच्या विविध प्रातांमध्ये, जातीजमातींमध्ये कार्यरत असलेली दिसते. मान
स्वातंत्र्य, समता, बंधुता, स्वाभिमान, परस्परांचा आदर करणारा प्रेमभाव यातून विकसित होणाऱ्या सामाजिक समरसतेचा जागर, भक्तीच्या माध्यमातून केलेले अपूर्व लोकसंघटन संतकार्याच्या आणि संतवाङ्मयाच्या मर्मस्थानी असल्यामुळेच आधुनिक भारतीय समाजसुधारकांनीदेखील आपापल्या परीने संतकार्य-संतवाङ्मय यांचा धांडोळा घेतलेला दिसतो.
भारतीय तत्त्वपरंपरेत संतांच्या उपदेशात, धुरीणांच्या कृतीमध्ये आणि जीवन व्यवहारात कोणत्याही विषमतेला कुठेही स्थान नाही याबद्दल निःशंक होऊन सामाजिक जा समरसतेच्या कार्यामधून विषमतेचा संपूर्ण व समूळ निपटारा करण्याचे प्रयत्न दुप्पट उत्साहाने करू लागतील असे हे पुस्तक आहे.
- डॉ. मोहन भागवत
सरसंघचालक, रा. स्व. संघ