Payal Books
Bharatachi Ujjwal Vidnyan Parampara भारताची उज्वल विज्ञान परंपरा
Regular price
Rs. 179.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 179.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आपल्या देशात सामान्य लोकांची अशी मनुधारणा आहे ती विज्ञान क्षेत्रातील प्रकाशाचे पहिले किरण पाश्चात्य आकाशातच फाकले आणि त्यामुळे अवघ्या विश्वाचे विकास चक्र गतिमान झाले. पूर्वेकडील विज्ञान क्षेत्राचे आकाश अंधकारमय होते. या मनोधारणेमुळेच फक्त पाश्चात्त्यांचे अनुकरण करण्याची वृत्ती आपल्या देशात आढळते. परिणामतः, आम्हाला काही विज्ञान परंपरा होती याबाबत काही माहिती नसल्यामुळे आधुनिक जगात आम्ही काही भूमिका वटवू शकतो याबद्दलचा आत्मविश्वासच नष्ट झाल्याचे सर्वत्र प्रत्ययाला येत आहे. परंतु विसाव्या शतकाच्या प्रारंभी आचार्य प्रफुल्लचंद्र राय, ब्रजेन्द्रनाथ सी जगदीश चंद्र बसू, रावसाहेब वझे आदी विद्वानांनी आपल्या गाढ्या अभ्यासाने सिद्ध केले होते की भारत फक्त धर्म, दर्शन क्षेत्रातच नाही तर विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात ही अग्रेसर होता इतकेच नाही तर आमच्या पूर्वजांनी विज्ञान व अध्यात्म यांचा समन्वय साधला होता. त्यातून निर्माण झालेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे विज्ञानाचा विकास जीवसृष्टीला अनुकूल आणि मंगलदाय असावा अशी दृष्टीही प्राप्त झाली. 'संस्कृत भारती' संस्थेने विज्ञान आणि वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र, धातुशास्त्र, यंत्रशास्त्र, रसायनशास्त्र अशा विषयावरील पुस्तके प्रकाशित करून हे दाखवून दिले आहे की आमचा देश खूपच प्रगत होता. त्याचेच हे सगळे पुस्तक रूपाने सादरीकरण केलेले आहे.

