Skip to product information
1 of 2

Payal Books

Bhagwan Buddha by Sirshree

Regular price Rs. 153.00
Regular price Rs. 170.00 Sale price Rs. 153.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
PUBLICATION

भगवान बुद्ध

'बुद्ध' हे नाव, आडनाव किंवा टोपणनाव नसून ती एक प्रकारची अवस्था आहे. यात ' मी कोण' याचं आकलन माणसाला होतं. या जगात काही जण बुध्दू न राहता बुद्ध होतात. बुद्ध होण्याच्या मार्गात सर्वात आधी बुद्धी आणि सामान्य ज्ञानाचा उपयोग होतो. विविध धारणा- समजुतींच्या सापळ्यातून सुटकेसाठी बुद्धीच उपयोगी पडते. मात्र तीच जर बुद्धिविलासात अडकली तर गुंता सुटण्याऐवजी वाढतच जातो. आपण आपल्या बुद्धीचा अत्युच्च विकास केला तर तिच्या साहाय्यानं आपण प्रज्ञावान आणि स्थितप्रज्ञ होऊ शकतो. मन- बुद्धीचा वापर कसा करायचा? मन निर्मळ कसं ठेवायचं?मन व बुद्धीचा समन्वय कसा साधायचा? यांसारख्या सर्व गोष्टींचा ताळमेळ साधल्यास बुद्धीचा सर्वोच्च विकास होतो.

सिद्धार्थ गौतमांनी मन-बुद्धीचा सम्यक उपयोग केल्यामुळे त्यांना संबोधी प्राप्त झाली. संबोधी म्हणजे समज ( अंडरस्टँडिंग). यानंतरच बुद्धत्व प्राप्त होऊ शकतं.


संबोधी प्राप्त झाल्यावर भगवान बुद्धांचा अनेक लोकांशी संपर्क आला. त्यात सर्वसामान्य गृहस्थ, राजघराण्यातील माणसं, संन्यासी वगैरे विविध प्रकारच्या लोकांचा समावेश होता. भगवान बुद्धांनी सम्यक ज्ञानाद्वारे लोकांची मनःस्थिती ओळखून त्यांना मार्गदर्शन केलं. ज्यांनी ते लक्षपूर्वक ऐकलं, समजून घेतलं त्या सर्वांनी बुद्धांच्या सहवासाचा पुरेपूर लाभ मिळवला. मात्र ज्यांनी फक्त वरवर ऐकलं, ते पूर्वीसारखंच जीवन जगत राहिले.

दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे. या साखळीबद्दल सविस्तरपणे सांगत भगवान बुद्धांनी दुःखमुक्तीच्या अवस्थेपर्यंत लोकांना नेण्यासाठी शिकवण दिली. तीच शिकवण आजच्या संदर्भात सरश्रींनी विपुल उदाहरणांसकट या पुस्तकात सांगितली आहे. त्यावर काळानुरूप भाष्य केलं आहे. दैनंदिन जीवनातील समस्यांकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून बघायला शिकवणारं हे पुस्तक आपला जवळचा मित्र होऊन राहील