Skip to product information
1 of 2

Payal Books

Beloved|बिलव्हेड Author: Asha Damle|आशा दामले

Regular price Rs. 178.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 178.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Pulications
द न्यू यॉर्क टाईम्स बुक रिव्ह्यूचे संपादक सॅम टॅननहॉस यांनी गेल्यावर्षी अमेरिकेतील काही लेखक, संपादक आणि वाड्मयीन व सांस्कृतिक परिघातील अनेक जाणकारांना पत्रे पाठवून त्यांना अमेरिकेतील गेल्या पंचवीस वर्षातील सर्वश्रेष्ठ कादंबरी कोणती असा प्रश्‍न विचारला होता. अर्थातच टॉनी मॉरिसन यांची ‘बिलव्हेड’ हे त्याचं उत्तर त्यांना मिळालं होतं.
टॉनी मॉरिसन या लेखिकेने ‘बिलव्हेड’ १९८७ मधे लिहिली. ह्या कादंबरीला पुलित्झर प्राईझ मिळालं व १९९३मध्ये नोबेल प्राईझही.
ही कादंबरी म्हणजे निव्वळ गुलामांच्या छळाची कहाणी नव्हे; अनेक घटना अनेक व्यक्ती पटावर आणण्यासाठीही तिची गुंफण झालेली नाही; तर इथे ह्या छळाचा इतिहास शोधला जातो आहे आणि या इतिहास-शोधाचा पोतही पुन्हा खोलवरच्या मनोविश्लेषणाचा अन् गहिर्‍या अनुभूतीचा आहे.
मानवतेच्या दुर्भाग्यावर आधारलेल्या ह्या कहाणीचा संदेश आहे - ’Be- loved', अर्थात ‘प्रेमाला पात्र व्हा!’