PAYAL BOOKS
Bara Senaninchi Charitre (बारा सेनानींची चरित्रे) by Major General V. K. Singh CA Anilkumar Shah
Couldn't load pickup availability
Bara Senaninchi Charitre (बारा सेनानींची चरित्रे) by Major General V. K. Singh CA Anilkumar Shah
पारंपरिक पद्धतीने सेनापतींचे चरित्र सांगताना मुख्यतः लढाया, रेजिमेंटचा इतिहास इत्यादीवर भर असतो. मात्र या पुस्तकात वैयक्तिक अनुभव, किस्से व आठवणी यांच्या साहाय्याने यातील बारा सेनापतींचे व्यक्तिमत्त्व उभे करत, त्या सेनापतींचा मानवी चेहरा समोर आणलेला आहे. या बारा दुर्दम्य सेनापतींची कहाणी सांगताना, इतिहासातील अनेक घटना आणि भारताचा स्वातंत्र्यलढा व फाळणीत राजकीय नेत्यांचा काय सहभाग होता यावर नव्याने प्रकाश टाकलेला आहे. लेखक स्वातंत्र्यानंतरच्या लष्कराच्या इतिहासाचे विहंगावलोकन करत त्यातील महत्त्वाच्या लढाया आणि त्यातील १९६७चे नाथू-ला किंवा १९६२ मधील गोवा कारवाई यांसारख्या अगदी अपरिचित आणि माहीत नसलेल्या घटना तपशीलवार सांगतात. लेखी दप्तरातून बटालियन व व्यक्तींचे उदात्तीकरण केले जाते, यश बढवून चढवून सांगितले जाते; तर चुका व अपयश दाबून टाकण्यात येतात. मात्र हे पुस्तक त्या त्या व्यक्तीच्या चारित्र्याची ताकद आणि विश्वास यांचे खरे चित्र समोर आणते. हे खूप महत्त्वाचे आहे, कारण भविष्याचा वेध घेऊ इच्छिणाऱ्या अभ्यासकांसाठी नेमके सत्य न सांगणारा इतिहास केवळ एक क्षुल्लक कथा ठरते. अर्थात हे काम काही सोपे नव्हे. मागे कधीही असा प्रयत्न झाला नसेल तेव्हा तर हे अतिशय जिकिरीचे ठरते. देशभर किंवा जगभर पसरलेल्या लोकांतून नेमके लोक निवडणे, त्यांचा शोध घेणे, त्यांना गाठून त्यांची मुलाखत घेणे हे सगळे त्यात आले. शिवाय मिळवलेली माहिती पडताळून पाहणे तितकेच महत्त्वाचे. हे अतिशय कष्टाचे, प्रचंड मेहनतीचे व खूप वेळखाऊ काम! या पुस्तकासाठी तो वेळ लागला होता पाच वर्षे ! ज्यांना कुणाला लष्कराच्या इतिहासाविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल त्यांनी तर हे पुस्तक जरूर वाचावे. आजच्या युवकांनी आणि कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने तर हे अवश्य वाचले पाहिजे. त्यात प्रशिक्षण, स्वाभिमान, ताठ कणा आणि अनेक कठीण प्रसंगातून या अतिशय प्रोत्साहित करणाऱ्या नेत्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कल्पकता यांचे अद्भुत दर्शन घडते. स्पर्धापरीक्षांची तयारी करणाऱ्या, तसेच अनेक सरकारी पदांवर काम करणाऱ्या तरुणांना या अधिकाऱ्यांचा आदर्श खूप प्रेरणादायी ठरेल.

