Skip to product information
1 of 2

Payal Books

Banubai (Dr. Banoo Coyaji)

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
PUBLICATIONS
महिला आणि बाल आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ. बानू कोयाजी यांची आज जन्मशताब्दी आहे. डॉ. कोयाजी केईएम हॉस्पिटल आणि ‘सकाळ’च्या माजी संचालक होत्या. या नििमत्ताने सकाळ प्रकाशन ‘बानूबाई’ हे चरित्रपर पुस्तक प्रकाशित करत आहे.  या पुस्तकाची संकल्पना, संशोधन आणि लेखन डॉ. बानू कोयाजी यांच्यासोबत काम केलेल्या डॉ. प्रतिभा कुलकर्णी यांचे आहे. 
बानूबाईंनी आपल्या कार्यकाळात ४० रुग्णव्यवस्थेच्या केईएम हॉस्पिटलचा विस्तार ५५० रुग्णव्यवस्थेइतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये केला. शिवाय वैद्यकीय क्षेत्रांतील नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, समस्या निराकरणासाठी त्यांनी केईएम रिसर्च सेंटरची स्थापना केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी सोशल वर्क डिपार्टमेंटची स्थापना केली. ग्रामीण भागातील लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी त्यांनी ग्रामीण आरोग्य क्षेत्रात नमुनादर्श ठरेल असा प्रकल्प वढू येथे राबवला. 
ग्रामीण आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव आंतरराष्ट्रीय स्तरावर रॅमन मॅगसेसे पुरस्काराने केला गेला; तर भारत शासनाने त्यांना ‘पद्म भूषण’ देऊन गौरवले.