Bandiwan | बंदिवान by Ema Donoghue Trans. Vasudha Joshi | एमा डोनाह्यू - अनुवाद वसुधा जोशी
Regular price
Rs. 470.00
Regular price
Rs. 525.00
Sale price
Rs. 470.00
Unit price
per
नजरकैदेत जन्म. बिनखिडकीच्या छोट्याशा खोलीत वावर. छतावरच्या काचेच्या कौलातून दिसणारा आकाशाचा तुकडा - एवढेच बाह्यजगताचे दर्शन. पळवून, अज्ञातवासात ठेवलेली तरुण आई - एवढीच काय ती साथ-संगत. टी.व्ही.वर दिसणाऱ्या वस्तू, झाडे, प्राणी, पक्षी ह्या केवळ पडद्यावरच्या काल्पनिक गोष्टी - हीच दृढ समजूत. ...पण एक दिवस अचानक, आपल्या वापरातल्या वस्तू टी.व्ही.वरपण दिसतात, हे या पाच वर्षांच्या बंदिवानाला कळते आणि... त्याचे भावविश्व उलटे-पालटे होते. त्याची बंदिवान आई हादरते आणि निर्धार करते... आता काहीही करून येथून निसटायचेच... त्यांच्या नजरकैदेची व्यथा आणि सुटकेची वास्तवकथा म्हणजे बंदिवान पण पाच वर्षांच्या मुलाच्या नजरेतून उलगडणारी!