Payal Books
Balvivah By Heramb Kulkarni बालविवाह
Couldn't load pickup availability
Balvivah By Heramb Kulkarni बालविवाह
बालविवाह विषय काढला, की अनेकांना ती समस्या मागच्या शतकातील होती असे वाटते. ‘आता कुठे होतात बालविवाह ?’ असे अनेकजण विचारतात.पण आजही भारतात आणि सुधारणेचा वारसा सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात बालविवाह मोठ्या संख्येने होतात. महाराष्ट्रात दर ५ लग्नामागील एक लग्न हा बालविवाह असतो. या बालविवाह होणाऱ्या मुलींचे सरासरी वय १४ ते १६ असते. खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांच्यावर मातृत्व लादले जाते. इतक्या लवकर लग्न झालेल्या मुलींचे शिक्षण होत नाही की करिअर. आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होतात. मुले आणि ती दोघेही कुपोषित राहतात. या विषयावर जाणीवजागृती व्हावी म्हणून राजस्थान, बिहार, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्ह्यांत फिरून बालविवाहांचे जमिनी वास्तव मांडणारा हेरंब कुलकर्णी यांचा हा लेखाजोखा… बालविवाहाचे वास्तव, परिणाम आणि उपाययोजना सांगणारा. शिक्षण आरोग्य आणि स्त्री सक्षमीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, बालविवाह थांबविणे ही पूर्वअट आहे. एकीकडे महिला सक्षमीकरणाचे ढोल वाजत असताना, दुसरीकडे लाखो मुलींचे आयुष्य करपून जाताना सरकार आणि समाज म्हणून आपण काय करणार आहोत ?

