Bal Paricharya By Sudha Patil
Regular price
Rs. 252.00
Regular price
Rs. 280.00
Sale price
Rs. 252.00
Unit price
per
सौ. सुधा पाटील यांनी आपल्या बाल परिचर्या या लिखाणाचे वाचन करण्यास मला विनंती केली. मला त्यांनी काय लिहिले असेल हे पाहण्याची उत्सुकता वाटली व मी वाचण्याचे कबूल केले. काही प्रकरणे वाचल्यानंतर त्यांच्या सविस्तर लिखाणाबद्दल मला त्यांचे फारच कौतुक वाटले. त्यांनी सहज सोप्या मराठी भाषेतून किचकट विषयही समजण्यास सोपा व सविस्तर रीतीने मांडला आहे. विषय समजण्यास सोपा होण्यासाठी योग्य ठिकाणी सुबक आकृत्यांचाही समावेश केलेला आहे. या पुस्तकात नवजात बालकाची काळजी, बालकाचे संगोपन, संवर्धन, संरक्षण आजारी बालकाची घरी व रुग्णालयातील काळजी, बालकाला होणारे आजार, चिन्हे व लक्षणे, विशेष उपचार व काळजी यांचे सविस्तर विवेचन केले आहे. तसेच बाल कल्याणकारी योजनांचीही सविस्तर माहिती दिली आहे. बाल परिचर्या विषयाचे मराठीतील या पुस्तकाच्या दर्जाचे पुस्तक यापूर्वी माझ्या तरी वाचनात आलेले नाही. हे पुस्तक नर्सिंगच्या सर्व कोर्सेसच्या विद्यार्थिनींना निश्चितच उपयोगी पडेल, यात शंका नाही. तसेच आजच्या काळातील प्रत्येक माता-पित्याच्या वाचनात अशी पुस्तके आल्यास त्यांना त्यांच्या मुलांच्या आरोग्याची काळजी सोपे सोपे होईल. हे पुस्तक लिहिल्याबद्दल लेखिकेचे अभिनंदन! डॉ. भोसले व्ही.ए. एम.डी (पेडि.), बालरोगतज्ज्ञ