Skip to product information
1 of 2

Payal Books

Bahuguni Vanaushadhi By Dr. Hari Krishna Bakhru, Arun Mande

Regular price Rs. 225.00
Regular price Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Condition
Language
Publicaion
अनेक वनस्पतींमध्ये (Herbs) विविध औषधी गुणधर्म असतात, शरीराची झीज भरून काढण्याची क्षमता असते. तसेच बर्‍याचशा आधुनिक औषधांचा मूलस्रोत वनस्पतींमध्ये असतो, हे सर्वचजण जाणतात. परंतु त्याची शास्त्रशुध्द मांडणी करणे व जनसामान्यांना नेमकी माहिती देणे, हे कार्य निष्णात निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू सातत्याने करीत आहेत. अनेक व्याधींवर वनौषधी गुणकारी कशा ठरू शकतात याबद्दलची माहिती बाखरू यांनी या पुस्तकात दिली आहे. या वनौषधी सहजपणे उपलब्ध होतात आणि काही तर आपल्या स्वयंपाकघरातच असतात. एकूण शंभरच्यावर उपयुक्त वनौषधींची माहिती या पुस्तकात आपल्याला मिळते. विविध वनस्पतींचे गुणधर्म, त्यांची शास्त्रीय माहिती, झीज भरून काढण्याची त्यांची क्षमता, या वनस्पतींची मात्रा कोणकोणत्या व्याधींवर चालू शकते; याविषयीचे विस्तृत विवेचन या पुस्तकात उपलब्ध होते. उत्तम आरोग्य राखण्यासाठी वनौषधींद्वारे नैसर्गिक उपाय सुचवणारे हे पुस्तक घराघरात पोहोचावे ही अपेक्षा.