PAYAL BOOKS
Bahubali Devdutt Pattanaik and Translated By Amita Naidu बाहुबली देवदत्त पट्टनायक अनुवादाअमिता नायडू
Couldn't load pickup availability
Bahubali Devdutt Pattanaik and Translated By Amita Naidu बाहुबली देवदत्त पट्टनायक अनुवादाअमिता नायडू
बाहुबली जैन धर्मातली 63 अंतर्दर्शने अनेक इतिहास संशोधकांना असं वाटत असतं की जैन धर्म आणि इतर तपस्वी विचार परंपरा या निव्वळ वैदिक कर्मकांडाच्या विरोधातल्या प्रतिक्रिया आहेत.परंतु अनेक जैन लोकांच्या मते त्यांच्या धर्माला कोणतीही सुरुवात नाही, उगम नाही. तो नेहमीच आजूबाजूला अस्तित्वात होता व आहे.या युगातले पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांनी जैन धर्माचा पुनर्शोध घेतला. ऋषभ यांचा मोठा मुलगा भरत राजांचा राजा चक्रवर्ती बनला आणि त्याने देशाला त्याचं नाव दिलं. भरताचा छोटा भाऊ बाहुबली याने हिंसेचा त्याग केला आणि मुक्तीचा जैन मार्ग अनुुसरला. इतर 23 तीर्थंकरांनी ऋषभ यांचा मार्ग अनुसरला. या तीर्थंकरांमधले शेवटचे तीर्थंकर महावीर होते. यांचा काळ 2500 वर्षांपूर्वीचा होता. ‘बाहुबली’ या पुस्तकात देवदत्त पट्टनायक यांनी भारतातल्या अत्यंत प्राचीन अशा परंतु लोकांना फारशा माहीत नसलेल्या अनेक श्रद्धांपैकी एक असलेल्या, श्रद्धेशी संबंधित अशा कथा, प्रतीकं, कर्मकांड आणि कल्पना यांचा धांडोळा घेतला आहे. यातून जैन धर्मातली तत्त्व व विचार अगदी आजही आपल्या सर्वांना का लागू पडणारी आहेत हे त्यांनी दाखवून दिलं आहे.
