Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Bahirji Naik Swarajyacha Shirpech बहिर्जी नाईक - स्वराज्याचा शिरपेच Gurunath Naik

Regular price Rs. 400.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 400.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Bahirji Naik Swarajyacha Shirpech बहिर्जी नाईक - स्वराज्याचा शिरपेच Gurunath Naik

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात अशा काही व्यक्ती समाविष्ट आहेत की, ज्यांनी महाराजांना जवळ जवळ आरंभापासून ते अंतापर्यंत साथ दिलेली आहे. त्यांमध्ये बहिर्जी नाईक हे व्यक्तिमत्व अतिशय महत्त्वाचे मानले जाते. कारण, महाराजांच्या सर्वात जवळ आणि दीर्घ काळ सान्निध्यात असलेली व्यक्ती म्हणजेच बहिर्जी नाईक होय. परंतु शिवाजी महाराजांच्या इतिहासात अभावानेच बहिर्जींना स्थान देण्यात आल्याचे दिसून येते.... अगदीच नगण्य असे. बहिर्जी हा महाराजांचा सर्वांत महत्त्वाचा माणूस होता. याचाच अर्थ, त्यांचा महाराजांशी थेट संपर्क असायचा. त्यांना आदेश महाराजांकडूनच मिळायचे आणि कोणतीही माहिती ते थेट महाराजांनाच देत असे. शिवकालीन इतिहासात स्वराज्य उभे राहताना मोलाची भूमिका बजाविणाऱ्या जगातील सर्वोत्तम हेराची ही जीवनगाथा असणारी कादंबरी गुरुनाथ नाईकांच्या लेखणीतून साकारलेली आहे. मराठी साहित्यविश्वात बहिर्जी नाईक या व्यक्तिरेखेवर लिहिलेली ही पहिली कादंबरी आहे.