Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Bahirji Naik Combo Set ( Khand 1 te 5) By Prem Dhande (बहिर्जी नाईक कॉम्बो सेट खंड १ ते ५ - प्रेम धांडे )

Regular price Rs. 1,900.00
Regular price Rs. 2,395.00 Sale price Rs. 1,900.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Bahirji Naik Combo Set ( Khand 1 te 5) By Prem Dhande (बहिर्जी नाईक कॉम्बो सेट खंड १ ते ५ - प्रेम धांडे )

1. शिवनेत्र बहिर्जी खंड १

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यातील एक प्रमुख अस्त्र कोणते...? 
अगदी स्वराज्याच्या पहिल्या लढाईपासून ते त्यांच्या शेवटच्या संग्रामापर्यंत शिवरायांनी ते अनोखे अस्र आपल्या जवळ बाळगले आणि त्यामुळे त्यांना अलौकिक असे यश मिळत गेले. त्या अस्राच्या जोरावर राजांनी बलाढ्य आदिलशाहीला मुठीत आवळून ठेवले. त्या अस्त्राच्याच जोरावर कपटी मोघल बादशाहा औरंजेबाला देखील त्यांनी आपल्या टाचेखाली ठेवले. 
ते अनोखे अस्र म्हणजे राजांचे गुप्तहेर खाते आणि गुप्तहेर खात्याचे प्रमुख ‘बहिर्जी नाईक’!
शिवरायांच्या या गुप्तहेरखात्याच्या कार्याचा वेध घेणारी एक महा कादंबरी शृंखला आता उपलब्ध आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात बेस्ट सेलर ठरलेली ही कादंबरी मालिका आपल्याला शिवकाळाची सैर घडवून आणते. सारे प्रसंग आपल्या डोळ्यांपुढेच घडताना दिसतात त्यामुळे आपण स्वतः बहिर्जी नाईकांची ती गूढ गाथा आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो.  . 

 

2. शिवनेत्र बहिर्जी खंड २

दुसऱ्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते –
•    जंजीऱ्याच्या सिद्दीवर जरब कसा बसला. 
•    अफजलखानाचा वध. 
•    पन्हाळ्याच्या वेढ्यातून शिवाजी राजे सुखरूप बाहेर पडले पण त्यात बहिर्जी नाईकांची काय भूमिका होती. 
•    उंबरखिडीच्या लढाईत सक्षम गुप्तहेरखात्याच्या जोरावर शिवरायांनी मोघलांची कशी दाणादाण उडवली. 
•    शायीस्तेखानावरील छाप्याचे अचूक नियोजन. 

3. शिवनेत्र बहिर्जी खंड ३

सह्याद्रीला अभिमान होता त्या पराक्रमी राजाचा, आणि त्या राजाला अभिमान होता त्याच्या शूर योद्ध्यांचा. ज्यांना ना इतिहासात जागा असणार होती ना त्यांच्या शौर्याचे कुठे कौतुक होणार होते, प्रत्येक क्षण ते स्वराज्यासाठी जगले, आपल्या परिवाराचा त्याग करून त्यांनी स्वराज्यालाच आपला परिवार मानले. ते महाबलशाली होते , ते महाचाणक्ष होते, शत्रूच्या गोटात राहून ते स्वराज्यासाठी लढले, त्यांच्या श्वासात आणि ध्यासात फक्त स्वराज्य होते. जसे ते आपले कर्तव्य गुप्तपणे बजावत राहिले तसेच स्वराज्याच्या इतिहासात देखील ते अदृश्यच राहिले. साडेतीनशे वर्षांनंतर आज ते वीर प्रकाश झोतात येत आहेत. त्या नायकांच्या, त्या योद्ध्यांच्या, त्या गुप्तहेरांच्या पराक्रमाची गाथा म्हणजे लेखक प्रेम धांडे लिखित "शिवनेत्र बहिर्जी" ही कादंबरी.* गेल्या तीन वर्षांपासून बेस्टसेलर चा 'किताब बाळगून असलेली ही कादंबरी प्रत्येक शिवप्रेमीला शिवकाळाची सैर घडवून आणते. शिवनेत्र बहिर्जी खंड 3

4. शिवनेत्र बहिर्जी खंड ४

या पुस्तकामध्ये 19 स्केचेस, 3 नकाशे - 1 कलर नकाशा, 2 कलर इमेज पाहायला मिळतील.    आदिलशाही क्रूर सरदार अजीजखान हा स्वराज्याच्या सीमेत घुसण्याआधीच त्याला १० जून १६६४ ला  कुडाळजवळ विषप्रयोग करून संपवण्यात आले. पण त्याच्यावर तो विषप्रयोग कोणी केला ? 
•    हजारोंच्या संख्येने सैन्यबल असलेल्या अजीजखानाच्या छावणीत घुसून त्याला मारण्याची आणि त्या छावणीतून सुखरूपपणे बाहेर पडण्याची ताकद फक्त मराठा गुप्तहेरांमध्येच होती. पण तो पराक्रमी गुप्तहेर कोण होता  ? आणि त्याने आपली ती धाडसी कामगिरी कशी पार पाडली ? 
•    सुरतेच्या लुटीचा प्रतिशोध घेण्यासाठी मोघल बादशाहा औरंगजेबाने विजापूरच्या आदिलशाहावर दबाव आणला, त्याला बळी पडून आदिलशाहाने पुन्हा एकदा आपली शक्तिशाली फौज स्वराज्यावर पाठवली. त्या फौजेचे नेतृत्व करत होता प्रती अफजलखान म्हणून ओळख असलेला ‘खवासखान’. 

5. शिवनेत्र बहिर्जी खंड ५ -

📚 प्रिबुकिंग ऑफर सुरू!
✅ पुस्तकाची किंमत : ₹४९९/-
🎯 प्रिबुकिंग विशेष किंमत : ₹४५०/-
✍️ लेखकांच्या स्वाक्षरीसह विशेष कॉपी