Skip to product information
1 of 2

Payal Books

Badlu Shaili Arogyasathi By Dr. Avinash Bhondve

Regular price Rs. 215.00
Regular price Rs. 240.00 Sale price Rs. 215.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

बदलती जीवनशैली आणि बदलते आजार याद्वारे आपल्याला आपले आरोग्य परिपूर्णतेने समजून घेणे आवश्‍यक आहे. त्याविषयी डॉ. अविनाश भोंडवे यांनी केलेले मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग केल्यास आपण निरोगी आयुष्याची सुरुवात करू शकतो.

धावपळीच्या आधुनिक जगाने अनेक नव्या आजारांना निमंत्रण दिले आहे. एखादा आजार झाल्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णांना त्यांची संपूर्ण जीवनशैलीच बदलण्याचा सल्ला देतात. पण, ते करणे प्रत्येकाला शक्य होत नाही. मग आपले जीवनमान सांभाळून रुग्ण औषधांचे सेवन करत राहतात, पण मूळ आजारावर उपाय होतोच असे नाही. मग त्यातून नवे तणाव निर्माण होतात. अशाप्रकारे आरोग्याचे एक दुष्टचक्र सुरु होते. त्यामुळेच बदलती जीवनशैली आणि बदलते आजार याद्वारे आपल्याला आपले आरोग्य परिपूर्णतेने समजून घेणे आवश्‍यक आहे. त्याविषयी डॉ. अविनाश भोंडवे यांनी केलेले मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग केल्यास आपण निरोगी आयुष्याची सुरुवात करू शकतो. धूम्रमान-मद्यपान, व्यवसायामुळे होणारे त्रास, एअरकंडिशनरचा वापर, पोट सुटण्याची समस्या स्मार्ट उपकरणांचा परिणाम, पर्यावरण किंवा ऋतुमान, व्यायामाचे महत्त्व या विषयावरील महत्त्वपूर्ण माहिती आपल्या ज्ञानामध्ये भर घालणारी आहे.

लेखकाविषयी माहिती : डॉ. अविनाश भोंडवे हे एमबीबीएस असून फॅमिली फिजिशियन म्हणून आरोग्यसेवेत कार्यरत आहेत. आपली आरोग्यसेवेतील प्रॅक्टिस करत असतानाच विविध वृत्तपत्रांमधून ते आरोग्यविषयक लेखन करत असतात. त्यातून त्यांनी स्वतःची लेखनशैली विकसित केली आहे. त्यांनी विविध विषयांवर १३ पुस्तकांचे लेखन केले असून पाच हजारांहून अधिक लेखांच्या माध्यमातून आरोग्याबाबत मार्गदर्शन केले आहे. आरोग्य विश्‍लेषक म्हणून ते वृत्तवाहिन्यांवर अनेकदा दिसतात. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. करोना महामारीच्या काळातही त्यांनी आरोग्यसेवेमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे.