Skip to product information
1 of 2

Payal Books

Babhulmaya by Vikas Gurav बाभूळमाया

Regular price Rs. 310.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 310.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Babhulmaya by Vikas Gurav बाभूळमाया

पोरा काळजी करू नगस. म्या नाय फास लावून घेणार. ऊन पावसाचा त्या घरट्यालाबी तरास हुतोया. मातूर त्याच फांदीवर त्येला जगायला पायजे. आपल्या पिलांसाठी. आपुनच आपल्यापाई नसल्यावर आपल्यास्नी तरी कुठला आधार? म्या तस नाय वागणार. माझ्या माथ्यावरच वझ तुमच्या तुमच्या पाठीवर नाय लादणार. शेतातल्या हद्दीच्या दगडावाणीच बापाच जगण आसतया बघ. स्वत:ला अडचणींच्या खड्ड्यात रुतवून घेतल्याल, मातूर त्योच समद्या शिवाराची हद्द दाखिवतोया. त्योच नसला म्हंजी घरातल्यांच्या जगण्याच मोजमाप कुठब सुरू करायच?

खरतर बांधावरच बाभूळझाड आणि बाप यांच्यात फरक तरी काय असतो? जगण दोघांचही एक, सहन करण दोघांचही एक आणि मनात जिव्हाळा लपवून वरवर कठोरपणा दाखवण दोघांचही एक. बाभळीचा डिंक कधीच मातीपर्यंत पोहचत नाही, तिथच त्या जखमेवर चिकटून राहतो. तसच बापाचा अश्रू कधीच गालावरून ओघळत नाही, कडा पानवतात आणि तिथच सुकुन जातात. तो बाप तिथल्या गाभ्यासारख आपल्या मुलांना कठोरपणा दाखवतो पण त्यांच्यासाठी हजार संकटे त्या काट्यांसारखी सोसतो. भेगाळलेल्या जमिनीत आपल्या सुखाच्या शोधात स्वत:ला हरवून राबतो. त्या बाभळीसारखाच त्याच जगण लवकर नाही ध्यानी येत. इवल्याश्या घरट्यासाठी आणि पिलांसाठी ज्यान भोगल, ज्यान सोसल, बाबा म्हणून त्याच जगण लवकर नाही कळत. तो लढतो, हरतो, अश्रू पुसतो, तरीही पुन्हा चालतो. पिकलेल्या केसात अन या दिनियेतील बाभळीसारख्या काट्यात पिलांसाठी तो बाभूळमाया जपतो.अशा बापाबद्दल मुलाची संवेदना व्यक्त करणारी कादंबरी....