PAYAL BOOKS
Ayushyatil Majja Ani Tantu By Dr. Deepak Ranade
Couldn't load pickup availability
Ayushyatil Majja Ani Tantu By Dr. Deepak Ranade
एका न्यूरोसर्जनचे हे आत्मचिंतन आहे.
आयुष्यात आलेले विविध अनुभव त्यांनी त्यांच्या सहज सोप्या आणि ओघवत्या शैलीतून मांडलेल्या आहेत. आयुष्याकडे बघताना नेमका दृष्टिकोन कसा ठेवायचा, आपल्या आजूबाजूच्या भवतालाचे भान ठेवून विवेकबुद्धी शाबूत कशी ठेवायची याचे मुक्तचिंतन लेखक दीपक रानडे यांनी केले आहे.
आयुष्याचे मर्म, विविध बोलके अनुभव दर्शविणारे हे पुस्तक एक वेगळे आणि अनोखे विचारधन वाचकांना देते.
या पुस्तकातील सर्व लेख हे भावनिक, आध्यात्मिक, भौतिक, आधिभौतिक चिंतनशैलीतून रानडे यांनी व्यक्त केले आहेत.
लेखकाविषयी :
वैद्यकीय उच्चशिक्षण घेऊन न्यूरोसर्जरीचा अभ्यासक्रम पूर्ण करून पुण्यात हॉस्पिटल उभारून पंधरावर्षे गरजू रुग्णांची रुग्णसेवा केली.
डीवाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये न्यूरोसर्जरी विभागाची स्थापना केली. वीसवर्षे त्या विभागाचा प्रमुख म्हणून काम केले.
दोन दशकांहून अधिककाळ ते अद्वैत वेदांताचा आणि Quantum Physics या विषयाचा अभ्यास करत आहेत.
त्यांना ट्रेकिंग आणि संगीताचीही आवड असून त्यांनी अनेक साहसी रोड ट्रीप केल्या आहेत.
