Payal Books
Avataranarth by Rahul Gadpale अवतरण राहुल गडपाले
Couldn't load pickup availability
या लेखांमधून त्यांनी लोकशाही व्यवस्थेला हानी पोहोचवणाऱ्या व्यक्ती, व्यवस्था, द्वेषमूलक विचार व संविधानविरोधी भूमिकांविरुद्ध चिकित्सक आणि कठोर भूमिका घेतली आहे. हे सखोल, विश्लेषणात्मक आणि विस्तृत लेख वाचकांना विचार करायला भाग पाडतात. हे पुस्तक आजच्या पिढीला आरसा दाखवणारे आहे.
चिकित्सा आणि विवेक जागृत असलेल्या प्रत्येकाने हे पुस्तक नक्की वाचायला हवे.
लेखकाविषयी :
राहुल गडपाले गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करीत आहेत. अमरावती जिल्ह्यातून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील शैक्षणिक घोटाळा उघडकीस आणला. त्यांच्या पहिल्याच बातमीला राज्यस्तरीय मानवी हक्क वार्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शोधपत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांना वाचा फोडली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया, डीएनए, सकाळ टाइम्स सारख्या इंग्रजी वर्तमानपत्रांमध्येही काम केले. 'सकाळ' मध्ये ते गेली अनेक वर्षे काम करीत आहेत. गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. अमेरिकेतील मिशीगन स्टेट विद्यापीठातून त्यांनी ग्लोबल मास्टर्स इन बीझनेस अॅनलिटिक्स ही पदविका मिळवली आहे. सध्या ते सकाळ माध्यम समूहात मुख्य संपादक म्हणून काम पाहत आहेत.
