Avalokan Marathi Samiksha Ani Sahitya अवलोकन मराठी समीक्षा आणि साहित्य by Digambar Padhyeदिगंबर पाध्ये
Avalokan Marathi Samiksha Ani Sahitya अवलोकन मराठी समीक्षा आणि साहित्य by Digambar Padhyeदिगंबर पाध्ये
साहित्यकृतीचा विचार करताना तिची कलात्मकता महत्त्वाची असतेच, पण तेवढ्याच आधारावर तिचे मूल्यमापन करता येत नाही, त्यासाठी तिच्यातून व्यक्त होणाऱ्या जीवनविषयक आकलनाकडे वळावे लागते. आणि हे आकलन किती नवे, मानवी जीवनाच्या संदर्भात किती व्यापक आणि काळ व आपला समाज या संदर्भात किती प्रस्तुत आहे यावरून ती साहित्यकृती किती मूल्यवान आहे हे ठरते.’ ज्येष्ठ समीक्षक प्रा. दिगंबर पाध्ये हे आपला हा समीक्षाविचार गेली ३५-४० वर्षे विविध साहित्यकृतींच्या अवलोकनाच्या निमित्ताने नियतकालिकांतून आणि चर्चासत्रांतून मांडत आहेत..
पाध्ये यांचा समीक्षाविचार लोकवाङ्मय गृहाला नेहमीच महत्त्वाचा व जवळचा वाटत असल्याने त्यांची यापूर्वीची ‘नारायण सुर्वे यांची कविता’ (१९८२) आणि ‘साहित्य, समाज आणि संस्कृती’ (१९९८) ही दोन्ही पुस्तके आम्ही आग्रहपूर्वक प्रकाशित केली होती. शिवाय नारायण सुर्वे, सदा कऱ्हाडे यांच्या काळापासून ते आजच्या आमच्या तरुण सहकाऱ्यांपर्यंत दिगंबर पाध्ये हे लोकवाङ्मय गृहातल्या आम्हा सर्वांना एक ज्येष्ठ मित्र, सहप्रवासी व मार्गदर्शक वाटत आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या साहित्यसमीक्षेचा हा तिसरा संग्रह प्रकाशित करताना आम्हाला आनंद होत आहे.
एका प्रकारे ‘साहित्याचे समाजशास्त्र’ या त्यांच्या पुढल्या ग्रंथाची
पायाभरणी करणारा हा लेखसंग्रह आहे, असे म्हणणे सार्थ व्हावे.
– सतीश काळसेकर