दृष्टीकोन तुम्हाला आणि तुमच्या संघाला
घडवू किंवा बिघडवू शकतो!
चांगल्या दृष्टिकोनामुळे संघाला यश मिळेलच अशी खात्री देता येत नाही; मात्र वाईट दृष्टिकोन नक्कीच अपयशाला कारणीभूत ठरतो. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ च्या विक्रीचा उच्चांक गाठणाऱ्या या पुस्तकाचे लेखक व नेतृत्वक्षमता प्रशिक्षणातील तज्ज्ञ जॉन मॅक्सवेल यांनी वरील वाक्यात दृष्टिकोनाच्या महत्त्वाविषयी भाष्य केले आहे. ज्यांनी कोणी चुकीचा दृष्टिकोन बाळगून लोकांचे नेतृत्व करायचा प्रयत्न केला आहे, त्यांच्या वाट्याला केवळ निराशाच आली आहे. हेच सूत्र लक्षात घेऊन लेखक दृष्टिकोनाविषयीच्या महत्त्वाच्या बाबींवर या पुस्तकात वाचकांना रुचेल व पटेल अशा भाषेत प्रकाश टाकतो. त्या बाबी खालीलप्रमाणे:
• आपण करीत असलेल्या कामावर आपल्या दृष्टिकोनाचा कसा प्रभाव पडतो, हे ओळखणे.
• स्वतःमधील व इतरांमधील त्रासदायक भावना, वर्तन व विचार यांच्यावर लक्ष केंद्रित करून त्यावर उपाययोजना करणे.
• सांघिक कार्याला कमकुवत करणारे सहा सर्वसामान्य दृष्टिकोन ओळखणे.
• चुकीचा दृष्टिकोन बदलण्याचे रहस्य जाणून घेणे.
• आपले काम सुधारण्याच्या दृष्टीने यश व अपयशाच्या नवीन व्याख्या तयार करणे.
• नेत्याला उच्चतम स्तरावर घेऊन जाणाऱ्या दृष्टिकोनाचा अंगीकार करणे.
आपले आयुष्य बदलवून टाकण्यासाठी योग्य तोच दृष्टिकोन कसा आत्मसात करावा व नकारात्मक दृष्टिकोनापासून कसे दूर राहावे याचे मार्गदर्शन करणारे प्रभावी पुस्तक!