Atmavanchana By Arun Shourie
Regular price
Rs. 405.00
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 405.00
Unit price
per
‘सेल्फ डिसेप्शन’ (आत्मवंचना) या पुस्तकात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत-चीन संदर्भात केलेला पत्रव्यवहार आणि त्या संदर्भात केलेली भाषणे यांचा आढावा घेऊन त्यावर अरुण शौरींनी भाष्य केलं आहे. त्यातून भारत-चीन संदर्भात नेहरूंचं धोरण कसं होतं, त्या धोरणांचे परिणाम काय झाले, तत्कालीन राजदूतांची भारत-चीन संदर्भातील मते, या प्रश्नाच्या संदर्भात माध्यमं काय करतात इ. मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनीR केला आहे. ‘साधी वस्तुाQस्थती ही आहे की सुरुवातीपासूनच चीनचा आपल्या प्रदेशावर डोळा होता; आक्रमण करण्यासाठी त्यांनी उघड उघड आपली स्थिती बळकट केली; पंडितजी आणि त्यांच्या निकटच्या अधिकाऱ्यां नी चीनच्या कारवायांविषयी डोळे घट्ट बंद केले आणि देश आता त्याची किंमत मोजत आहे...’ हा या पुस्तकाचा आशय आहे. पंडित नेहरूंनी भारत-चीन संदर्भात वेळोवेळी केलेला पत्रव्यवहार आणि भाषणे यातून हा आशय अधोरेखित होतो. भारत-चीन संबंधाबाबतची वस्तुस्थिती, त्याबाबतचं भारताचं धोरण, त्याचे परिणाम आणि बाळगायची सतर्कता याविषयी विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचलंच पाहिजे.