Aswasthayan |अस्वस्थायन Author: Uddhav Kanade |उद्धव कानडे
उद्धव कानडे हे नाव काव्य आणि कादंबरीच्या क्षेत्रात आता स्थिरपद झालेले आहे. आरंभीच्या काळात एक हौशी कवी व सफल सूत्रसंचालक म्हणून ते लोकप्रिय होते. आता ‘अस्वस्थायन’ या काव्य ग्रंथाच्याद्वारे एक जीवनाश्लेषी चिंतनशील कवी म्हणून वाचकांसमोर येत आहेत. या संग्रहातील त्यांच्या कविता केवळ प्रतिक्रियात्मक किंवा उद्गारात्मक नाहीत; त्याना त्रयस्थपणाने केलेल्या विधानांचे स्वरूप राहिलेले नाही. आता त्यामध्ये जिवंत अनुभवांचा थरार उमटला आहे. कवितेच्या ओळी अनुभवाच्या अमृताने चिंब भिजलेल्या वाटतात. या संग्रहातील कविता म्हणजे कवीचा स्वत:शीच चाललेला संवाद आहे. अनुभवाशी प्रामाणिक राहणे ही प्रगल्भतेच्या प्रदेशातील प्रवेशासाठी आवश्यक असणारी अटच असते. बुद्धीला सुखावणार्या कल्पना, अंत:करणाला गुंगविणारे शब्दलाघव, याबरोबरच अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षणास प्रवृत्त करणारे गाढ चिंतनही या कवितांमधून प्रगट झाले आहे. कानडे यांची कविता आता वयात आल्याचीच ती खूण आहे. - प्रा. राम शेवाळकर