Skip to product information
1 of 2

Payal Books

Astitwawaad Ani Marathi Kadambari By Rekha Inamdar Sane

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Condition
Publication
Language
पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या इतिहासात अस्तित्ववादी विचारसरणाने क्रांतीच घडविली. या घटनेचे श्रेय कीर्केगार्ड, नीत्शे, यास्पर्स, मार्सेल, हायडेगर, काम्यू व सार्त्र यांच्याकडे जाते. अस्तित्ववादाने सुमारे चारेक दशके पाश्चिमात्य जगतातील साहित्यनिर्मिती, समीक्षादृष्टी व कलाविचार यांवर आपली कायमची मुद्रा उमटविली. दोन महायुध्दांच्या आसपासचे राजकीय-सामाजिक वातवरण , स्तब्ध झालेला धर्मविचार, उद्ध्वस्त समाजमानस आणि बेभरवशाचे व्यक्तिजीवन यांचा अस्तित्ववादाच्या उदयाशी व विकासाशी जवळचा संबंध आहे. १९६० ते १९८० या कालावधीत मराठी साहित्य व समीक्षा यांवरही अस्तित्ववादाचा प्रभाव होता. रेखा इनामदार-साने यांनी अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी या ग्रंथामधून अस्तित्ववादाच्या उदयाशी तसेच जडणघडणीची नेटकी मीमांसा केली आहे. तसेच आस्तिकता-नास्तिकता, निवडीचे स्वातंत्र्य, परात्मता, असंगतता, अस्सल जीवनसरणी इत्यादी अस्तित्ववादी आशयसूत्रांचा सप्रमाण उलगडा केला आहे. तत्वज्ञान आणि साहित्य यांमधील परस्परसंबंधाची सूक्ष्म चिकित्सा करून मराठी कादंबरीविश्वात मूलगामी परिवर्तन घडविणा-या कोसला, बॅरिस्टर अनिरूध्द धोपेश्वरकर, पुत्र, सात सक्कं त्रेचाळीस, एन्कीच्या राज्यात या कादंब-याचे अस्तित्ववादाशी असणारे नाते त्यांनी विश्लेषणपूर्वक स्पष्ट केले आहे. अस्तित्ववाद आणि कादंबरी या दोहोंचे सांगोपांग विवरण करणारा हा मराठीतील पहिला ग्रंथ आहे.