या जगात प्रत्येकाला जन्माला घालण्यामागे परमेश्वराचा काही ना काही उद्देश आहे. तुम्हीही त्याला अपवाद नाही. परमेश्वराने तुम्हाला ज्या कामासाठी पाठविले आहे ते तुम्हाला करावे लागेल, यात काहीच संशय नाही. तुमच्या मनात काही संशय असेल तर तो दूर करा. संशयाची सारी बीजे आणि भावना मनातून काढून टाका. तुम्हाला दु:ख, अपयश आणि निराशेकडे घेऊन जाणार्या प्रत्येक वस्तूला तुम्ही तुमच्या जवळ का येऊ देता? मनात नेहमी चांगले आणि आशादायी विचार निर्माण करण्याची तुम्हाला सवय लागेल, तेव्हा तुमचे मन नेहमी आनंदी आणि उत्साहाने भरलेले राहील. त्यामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल. यश मिळवाल. तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल असावा, तुम्हाला सर्व प्रकारचे सुख, यश मिळावे, प्रगती होऊन सर्व आवश्यक गोष्टी मिळाव्यात; यासाठी मन, वचन आणि कर्माच्या साहाय्याने तुम्ही प्रयत्न करा. यशासाठी या जगात प्रवेश करताना तुमच्याकडे अजिबात नसलेली धनसंपदा तुमच्याकडे आपोआप येत जाईल. |
Ashakya..? Shakya…! | अशक्य…? शक्य…! by AUTHOR :- Swett Marden
Regular price
Rs. 106.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 106.00
Unit price
per