Skip to product information
1 of 2

Payal Books

Ase Ghadava Mulanche Vyaktimatva by Dr Rama Marathe असे घडवा मुलांचे व्यक्तिमत्त्व - डॉ. रमा मराठे

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications
"हे पुस्तक लिहिणारी व्यक्ती मानसशास्त्रातील पदवीधर नाही यावर विश्‍वास बसू नये", ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनाकार डॉ. शुभा थत्ते ह्यांच्या म्हणण्याशी सहमत व्हावे असे हे मुलांचे मन अचूक जाणून त्याला वळण कसे लावावे व ते लावतांना काय टाळावे ह्याचे आदी बोलक्या भाषेत आणि प्रत्येक बाबतीतील उदाहरणे देत केलेले तितकेच अचूक मार्गदर्शन म्हणजे हे पुस्तक. पालक मुलांना वाढविताना काही गोष्टींकडे मुद्दामुन दुर्लक्षच करतात असे नव्हे तर काही बाबी त्यांच्या लक्षातच येत नाहीत.

डॉक्टर असलेल्या लेखिकेने ही गोष्ट नेमकी जाणली आहे आणि तिच्यावर विचारमंथनही केले आहे न् त्यातूनच ह्या लेखनाची निर्मिती झाली आहे. लेखिका एफ्. आय. सी आहे त्यामुळे स्वत:ने लिहिले ते प्रत्यक्षात ताडून पाहणेही तिला शक्य झाले आहे. लेखिकेला बालरोगतज्ज्ञ डॉक्टर पतीचीही साथ मिळाली आहे आणि हे सारे जागरूकपणे, विशिष्ट ध्येयाने केलेले असल्यामुळे हा परिपाक चांगलाच जमून आला आहे.