जगातील असामान्य प्रज्ञावंत शोधव्रती…
ज्यांनी मानवी कल्याणाच्या ध्यासातून संशोधनाचे
कष्टमय कार्य केले. त्यासाठी अवितर झटल्या.
या महिला संशोधकांनी आपल्या कार्याद्वारे
जगाच्या नकाशावर आपला ठसा उमटवला;
पण हे करताना त्यांना प्रत्यक्ष काय संघर्ष करावा लागला..?
त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात यामुळे कोणती वादळे उठली..?
याची उत्तरे या पुस्तकात सापडतात.
एकीकडे ज्ञानप्राप्तीचं चिंतन आणि दुसरीकडे
कुटुंब-आप्त यांची चिंता! संशोधन कार्यातील वेग आणि
वैयक्तिक पातळीवरील भावनांचा आवेग.
दोन्हीत स्पष्ट रेघ मारत यांनी संशोधनाला दिलेले प्राधान्य,
आपली मानव कल्याणाची धडपड, खडतर वाटचालीदरम्यान
दोलायमान मनोपटलावरही ठाम राहून त्यांनी सिद्धीस नेलेले कार्य!
हे सारं वाचताना अचंबित होतो आपण आणि त्याचबरोबर
वाटतो काहीसा खेदही… ‘स्त्री’ म्हणून संशोधन क्षेत्रात
काम करताना ‘तिच्या’ वरील मर्यादा, तिच्यावरील बंधनं;
पण या साNयावर मात करून सरतेशेवटी तिचं घवघवीत यश दिपवतं!
विविध क्षेत्रातील क्लिष्ट विषयातील संशोधनात
सिद्ध होताना ज्या प्रज्ञावंत स्त्रियांनी अवघे आयुष्य वेचले
त्यांचे हे चरित्रबंध! सुप्रसिद्ध विज्ञानलेखक निरंजन घाटे यांच्या
खास शैलीतील ही मांडणी वाचकांना काहीतरी अर्थगर्भ आणि
सकस वाचल्याची अनुभूती देते.
Payal Books
Asamanya Mahila Sanshodhak | असामान्य महिला संशोधक by AUTHOR :- Niranjan Ghate
Regular price
Rs. 156.00
Regular price
Rs. 175.00
Sale price
Rs. 156.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
