PAYAL BOOKS
Artificial Intelligence Neelambari Joshi आर्टिफिशिअल इंटेलिजन्स नीलांबरी जोशी
Couldn't load pickup availability
Artificial Intelligence Neelambari Joshi आर्टिफिशिअल इंटेलिजन्स नीलांबरी जोशी
मानवी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता परस्परभिन्न पण परस्परपूरक असल्याने त्या
परस्परांच्या शत्रू किंवा प्रतिस्पर्धी असू शकत नाहीत. केवळ आंधळा ‘स्वीकार'
किंवा संभाव्य धोक्यांमुळे वाढणाऱ्या भयगंडापोटी ‘नकार' याऐवजी डोळस ‘सहकार'
हीच मानवतेच्या भविष्यातील प्रगतीची दिशा आहे. हा या ग्रंथाचा सूज्ञ आणि विवेकी संदेश आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरची अनेक मराठी पुस्तकं चाळल्यावर एका अधिक सकस
ग्रंथाची निकराची गरज नेहमी जाणवत असे. नीलांबरी जोशी यांच्या या अभ्यासपूर्ण आणि
सुबोध ग्रंथाने ती अपेक्षा अपेक्षेपेक्षा अधिक समाधानकारकपणे पूर्ण केली. या ग्रंथाचा आशय
म्हणजे ऑप्शनला टाकताच येणार नाही अशी नव्या जगाची साक्षरता. तो वाचणारा होईल
साक्षर आणि सक्षम, स्मार्टर आणि वाईजर. आणि न वाचणारा? अर्थातच, नव्या दुनियेतला
निरक्षर आणि डंब!
