Arthshastracha Sankshipt Itihas By Andrew Leigh अर्थशास्त्राचा संक्षिप्त इतिहास अँड्र्यू ली
Regular price
Rs. 188.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 188.00
Unit price
per
Arthshastracha Sankshipt Itihas By Andrew Leigh अर्थशास्त्राचा संक्षिप्त इतिहास अँड्र्यू ली
हे छोटेसे पुस्तक आपल्याला खूप मोठी कहाणी सांगते. प्राचीन काळापासून ते आधुनिक जगापर्यंत अर्थशास्त्राच्या लघुतम इतिहासाचे हे पुस्तक म्हणजे युद्धांच्या मागे प्रच्छन्न आर्थिक शक्ती कशी काम करत असते, नवनवीन शोध कसे लागत असतात आणि सामाजिक बदल कसे होत असतात या गोष्टी मुळापासून उकरून काढते. भांडवलशाही आणि मार्केटच्या पद्धती यांचा उगम कसा होतो आणि अर्थशास्त्राच्या या विद्याशाखेला महत्त्वाच्या कल्पना प्रदान करणारे लोक कसा आकार देतात याचा मागोवा हे पुस्तक घेतं.
कृषिक्रांतीपासून ते आपला ग्रह दिवसेंदिवस आणखी आणखीच कसा उष्ण होत जातोय, या गोष्टीपर्यंत अँड्य्रू ली हे आपल्याला अर्थशास्त्राविषयीची ही कहाणी सांगतात. या कहाणीत शतकानुशतकांपासून आणि वेगवेगळ्या खंडांचा विचार करत अर्थशास्त्र या विद्याशाखेमध्ये अंतर्भूत असलेली विविधता अधोरेखित होत राहते. मक्तेदारीच्या खेळाच्या मुळापर्यंत ते जातात आणि नांगराच्या शोधामुळे लैंगिक भेदाभेद कसे वाढले ते उलगडून दाखवतात. काही रोगांमुळे वसाहतवादाच्या काही प्रकारांना कसा आकार प्राप्त झाला तेही सांगतात. अमेरिकी शहरांमध्ये गगनचुंबी इमारती निर्माण होण्याची कारणे विशद करतात आणि बरेच काही सांगून जातात.
या सगळ्या विचारमंथनाचा परिणाम म्हणजे आपल्या विवाला आकार देणारे असे अर्थशास्त्रीय कल्पनांवर आणि शक्तिस्त्रोतांवर प्रकाश टाकणारे हे रंजक पुस्तक.