Payal Books
Arogyadham आरोगयधाम By B. K. Chaudhary बी. के. चौधरी
Couldn't load pickup availability
या पुस्तकात स्वच्छता, अध्यात्म, योग, कर्म, शेती, पैसा, ताणतणाव, सकारात्मक विचार आणि आरोग्य यांविषयी सखोल आणि सविस्तर माहिती दिली आहे. आपले शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक आहेत, आणि त्या दोघांचे आरोग्य किती महत्त्वाचे आहे हा मूलभूत विचार बी. के. चौधरी यांनी ‘आरोग्यधाम’ मधून मांडला आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याविषयी जागरूक असणाऱ्या प्रत्येकाने ‘आरोग्यधाम’ नक्कीच वाचले पाहिजे. निरोगी आयुष्याची महत्त्वपूर्ण सूत्रे यात मांडण्यात आली आहे.
लेखक :
बी. के. चौधरी यांनी विज्ञान शाखेतून पदवी घेतली, त्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून तब्बल छत्तीस वर्षांहून अधिक काळ सेवा केली. गणित आणि विज्ञान हे दोन विषय त्यांनी शिकवले. २००७ मध्ये ते मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. वाचनाचा आणि लेखनाचा छंदही त्यांनी जोपासला. अनेक कविता त्यांनी लिहिल्या. मनसोक्त फिरणे, नियमित योगाभ्यास करणे हाही त्यांचा छंद आहे. शरीर चांगले आणि निरोगी राहण्यासाठी जे जे करता येईल ते ते मनापासून करतात.
