Payal Books
Ardhya manasachi ardhi gosthअर्ध्या माणसाची अर्धी गोष्ट सागर कुलकर्णी
Couldn't load pickup availability
नाल्यात पाणी संथपणे वाहत होतं.. त्यात थरथरणारं चंद्रबिंब दिसत होतं. त्या बिंबाला विस्कटत पाणी पुढे जात होतं, पण चंद्रबिंब आपली विखुरलेली प्रतिमा गोळा करत अट्टहासाने त्याच जागी तरंगत होतं. कुत्र्यांच्या मळ्यातली कुत्री आता निघून गेली होती, पण एक कावळा तिथेच थांबला होता. आकाश सांगत असलेली गोष्ट ऐकायला? की तो मला बरोबर गोष्ट सांगतोय ना यावर लक्ष ठेवायला?....
जय माझी वाट का बघत होता ? आणि मी गेल्यावर मला घाईत परत का पाठवत होता? तो नेहमी म्हणायचा मी जिंकणार नसेन तर हरू तरी का ? काही झालं तरी गेम संपला नाय पायजे. गेम संपणार नाही मित्रा, गेम चालूच राहील.. कारण... हा जय नावाचा
इतिहास नाही. वर्तमान आहे.
सगळ्यांच्याच नशिबात रिंग मास्टर होणं नसतं. काही जणांच्या ते रक्तातच नसतं. आणि झेप घेतल्यावर सावरणारा, पडू न देणारा हातही प्रत्येकाच्या नशिबात नसतो. एखाद्याच्या नशिबात पडणच असतं. विदुषक होणच असतं.. हे काकामामा मला सांगत असताना मला शेजारी त्याच्या जागी विदूषकच दिसत होता आणि सर्कशीच्या रिंगणात धडपडणारा.. काकामामा...
विलक्षण माणसांच्या, वास्तव आणि कल्पना यांच्या सीमा धूसर करणाऱ्या या कथा वाचकांना त्यांच्या विश्वात, त्यांच्या आयुष्यात घेऊन जातील. कथा संपली तरी मनात रेंगाळत राहतील
