Anubisch Rahasya Ani Etar 3 Katha By
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ची मालिका सर्व वयोगटाच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने ‘रोहन प्रकाशन’ पुन्हा एकदा घेऊन आलं आहे – याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचे ४ संग्रह; त्यातल्या या ४ कथा…
१. किमती वस्तूंचे संग्रहालय असलेल्या राजनबाबूंना एके दिवशी छापील अक्षरं कापून तयार केलेलं धमकीचं पत्र येतं… नंतर एक मुखवटाधारी माणूसही त्यांना घाबरवून सोडतो. कोण असेल हा ‘दार्जिलिंगचा धोका’दायक माणूस?
२. कैलास चौधरींना आलेल्या एका निनावी पत्रात त्यांच्याकडचं एक मौल्यवान रत्न विशिष्ट ठिकाणी आणून देण्याबद्दल सांगितलेलं असतं. आणि तपास करताना फेलूदासमोर येतं ‘कैलास चौधरींच्या रत्ना’ विषयी एक अनपेक्षितच सत्य!
३. किमती वस्तूंचे संग्राहक नीलमणीबाबू यांना इजिप्तशियन चित्रलिपीत लिहिलेलं एक पत्र येतं. त्यात धमकी तर नाहीये ना, याचा शोध घेताना दुसर्या एका संग्राहकाकडचीही इजिप्तशियन मूर्ती चोरीला जाते. चित्रलिपीसारखं गूढ वाटणारं ‘अनुबिसचं रहस्य’ फेलूदा कसं सोडवेल?…
४. राधारमण समाद्दार या काहीशा श्रीमंत, विक्षिप्त पण बुध्दिमान संगीतवाद्य संग्राहकाचे अखेरच्या क्षणी शब्द असतात – ”माझ्या नावात… किल्ली… किल्ली…!” या ‘किल्ली’त दडलेलं रहस्य फेलूदा कसं उकलेल?