Antpar By: Suresh Patil
समाज हा प्रवाहित असून ही क्रिया अखंडपणे सुरू असते. आपण कितीही नैसर्गिकतेच्या (Natural) गप्पा मारल्या तरी संस्कृती नावाचं भूत जन्माला आलं, अन् व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आला. कालपरत्वे नियम, निर्बंध आदी बाबीमध्ये बदल घडून आले, घडविले गेले. बदल योग्य- अयोग्य असले तरी त्यामुळे बळीच्या भूमिकेत प्रामुख्याने स्त्रीच आढळते. रुढी, परंपरा घराण्याची इज्जत, मानसन्मानाचं जू हे स्त्रीच्याच मानेवर आलं, ते झुगारून देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या वाट्याला आलं ते दुःख, वेदना, मानहानी. संगणक तंत्रज्ञानामुळे झपाट्याने बदल घडले, तरी तेही एक वेगळंच संकट ठरलं!
दंड थोपटून मैदानात उभ्या राहिलेल्या 'अंतपार' मधील लाराची कहाणी काय सांगते...