Skip to product information
1 of 2

Payal Books

Antaralatil Netradeepak Mahila | अंतराळातील नेत्रदीपक महिला by AUTHOR :- Soniya Gueldenpfennig

Regular price Rs. 132.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 132.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

जगाच्या अंतराळ संशोधनातील कामगिरीचा मागोवा घेताना मानवी इतिहासातील या महत्त्वाच्या क्षेत्रात आपल्यालाही सहभाग नोंदवता यावा यासाठी प्रदीर्घ लढा दिलेल्या महिलांच्या चरित्रात्मक कथांच्या माध्यमातून आपण जणू अवकाशाचीच सफर करणार आहोत. या पुस्तकातील दहा चरित्रकथांची सुरुवात झाली कित्येक वर्षांपूर्वी. आकाशातील तारकापुंजांचा नकाशा तयार करण्याच्या कामात सहभाग घेणार्‍या, अवकाशातील परिस्थितीचा मानवी शरीरावर काय परिणाम होऊ शकतो हे तपासणार्‍या सुरुवातीच्या प्रयोगांमध्ये सहभाग नोंदवणार्‍या आणि अवकाशात पाऊल ठेवत इतिहास घडवणार्‍या अशा अनेक अवकाशनायिकांना तुम्ही या पुस्तकातून भेटाल.
या महिलांनी तारकांपर्यंत पोहोचण्याचं जे झगमगतं स्वप्न पाहिलं, ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी कशा चित्तथरारक मोहिमा हाती घेतल्या, त्यात त्यांना कोणती आव्हानं पेलावी लागली, यामधून त्यांच्या अंतराळविषयक ज्ञानात कशी भर पडत गेली, अवकाशातील गमतीजमती त्यांना कशा अनुभवता आल्या याची वेधक माहिती या पुस्तकातून वाचायला मिळेल.