Annapuran-Aayurvedic Aadhunik By Arvind Limaye
Regular price
Rs. 446.00
Regular price
Rs. 495.00
Sale price
Rs. 446.00
Unit price
per
चरकाचार्यांनी हजारो वर्षांपूर्वी आहारातूनच रोग उत्पन्न होतात, असे म्हटले आहे. त्याकाळी पाणी व आहारद्रव्ये प्रदूषित व भेसळयुक्त नव्हती. आज २१व्या शतकात प्रदूषण, रासायनिक खते व भेसळ यामुळे आहारद्रव्ये नि:सत्त्व व प्रदूषित झाल्याने, चुकीच्या आहारामुळे रोग होण्याचे प्रमाण निश्चितच वाढले आहे. प्रत्येक नागरिकास आहारद्रव्यांचे गुणधर्म माहीत असणे व आहार नियोजन समजणे, हे आवश्यक आहे. यासाठीच आयुर्वेदिक व आधुनिक चश्म्यातून मांसाहार व शाकाहारातील तृणधान्ये, कडधान्ये, फळभाज्या-पालेभाज्या, फळे, मसाले, सुकामेवा, दुग्धजन्य पदार्थ, शीत-उष्ण पेये, साखर-गूळ यांसारख्या रोजच्या व्यवहारातील २५० अन्नद्रव्यांचे विवेचन म्हणजेच अन्नपुराण.