Skip to product information
1 of 2

Payal Books

Anna He Apoornabrahma अन्न हे अपूर्णब्रह्म Shahu Patole शाहू पाटोळे

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Anna He Apoornabrahma अन्न हे अपूर्णब्रह्म Shahu Patole शाहू पाटोळे

‘अन्न हे पूर्णब्रह्म’ या म्हणण्यातील फोलपणा स्पष्ट करणारं 

शाहू पाटोळेचं हे पुस्तक आहे. आजवर अस्पर्शित राहिलेला हा विषय असून महत्त्वाचं म्हणजे, अभिजनांच्या खाद्यविषयक प्रस्थापित समजांना धक्का देणारं, तसंच आकलनाच्या कक्षा वैपुल्याने विस्तारणारं हे लेखन आहे. मराठीत खाद्यसंस्कृतीशी संबंधित आजवर जो मजकूर प्रकाशित झाला आहे तो, संपूर्ण समाजाच्या खाद्यसंस्कृतीचं यथार्थ चित्रण करणारा  कसा नव्हता, याची एक सुन्न जाणीव हा मजकूर वाचल्यानंतर येते आणि आपल्या अज्ञानाची वीण उसवत जाते.

गावकुसाबाहेर जगणार्‍यांच्या खाद्यजीवनाचा धांडोळा शाहू पाटोळे यांनी अत्यंत वेधक शैलीत मांडला आहे. या लेखनात विद्रोह आहे, पण त्या विद्रोहाचा दाह जाणवत नाही. कधी स्वगत,  कधी आत्मपरीक्षण, कधी संबोधन तर कधी समाजातील जातिव्यवस्थेवर बोचकारे काढत/बोचकारे ओढत हा मजकूर आपल्यासमोर येतो. जातीच्या उतरंडीतून वाट्याला आलेल्या जगण्याबद्दल किंचित खंत या लेखनात जाणवते मात्र,  ती पूर्ण क्षम्य आहे. लेखकानं विलक्षण ताकदीनं एक प्रकारचा ‘खाद्यविद्रोह’ प्रवाही शैलीत व्यक्त केला आहे. हा मजकूर लिहिण्याआधी लेखकानं त्याच्यातील स्वत्वाचा म्हणजे, त्याच्या जातीच्या संचित आणि संस्कृतीचा वेध घेण्यासाठी संतसाहित्याचा सव्यसाची धांडोळा घेतला आहे. परिणामस्वरूप त्याच्या लेखनाचा आकृतिबंध वेगळ्या ढाच्याचा झाला असून डौलदार समंजसपणा या लेखनाला लाभला आहे. 

- प्रवीण बर्दापूरकर