Ani Sahitya | आणि साहित्य Author: G. M. Kulkarni |गो. म. कुलकर्णी
ऐन कलावादाच्या काळापासून प्रा.गो.म.कुलकर्णी साहित्याचा समाजशास्त्रीय अभ्यास करण्याविषयी आग्रही असल्याचे दिसतात. ते असतानाच त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आणि सत्तरोत्तरी मराठी समीक्षाप्रवाहाने समाजशास्त्रीय दृष्टीने होणारी समीक्षा स्वीकारलीही. तथापि प्रा.गो.म.कुलकर्णींचे वैशिष्ट्य हेच की, एका बाजूला ते साहित्याच्या समाजशास्त्रीय आकलनाला, समीक्षेला प्राधान्य देत असले तरी दुसर्या बाजूने ते अखेरत: साहित्याच्या सर्वांगीण आकलनासाठीच आहे, याचे भान ते विसरू देत नव्हते. त्यांनी साहित्याचा अक्ष कधीही सोडलेला नव्हता हे महत्त्वाचे. हा समीक्षा-लेखसंग्रह याचीच साक्ष देणारा आहे.