Skip to product information
1 of 2

Payal Books

Anahat By Swati Chandorkar

Regular price Rs. 153.00
Regular price Rs. 170.00 Sale price Rs. 153.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
‘‘राजाचा पुत्र हा राजाच झाला पाहिजे, यह जरुरी नहीं है। आपल्या दोघांना बघ! वेदशास्त्री! एक महान योगी, परंतु त्यांची दोन मुलं – एक वेदाभ्यास अध्ययन करून आज अनेक शिष्यांना विद्या दान करतो आहे आणि एक? बीन लेके घूम रहा है। यहाँ-वहाँ! वेदशास्त्र्याचा पुत्र बडे उस्ताद!`` ‘शास्त्रज्ञोप्यलोकज्ञो मूर्खतुल्यः’ अर्थात्, जो शास्त्र जाणतो; पण लोकपरीक्षा जाणत नाही, तो मूर्खासारखा होय! आपण दोघंही हे शिकलो आहोत. फर्व इतनाही है, तू आज ते इतरांना शिकवतोस आणि मी ते प्रत्यक्षात उतरवतो. आत्मतत्त्व? माझं आत्मतत्त्व कोणतं आहे? ते माझ्या मनाला आणि वाणीला समजत नाही का? पण मला समजतं. मला जाणवतं. आता मला पूर्णत्वानं जाणवतं. माझं आत्मतत्त्व सूर आहेत. मला लक्ष्य समजलं नाही... मला त्याचा भेद समजत नाही... पण स्वर मला भेदून जातात. मी नाही या अध्ययनासाठी. माझं अध्ययन म्हणजे बडे उस्तादांचे सूर. ढग बाजूला झाले आहेत. मळभ गेलं आहे. स्वच्छ निर्मळ सूर्यकिरणं... थेट माझ्या मनाच्या अनाहतपर्यंत पोहोचणारी.... पारदर्शक करणारी.... त्या शुद्ध स्वरासारखी... मला अनाहतमध्ये उतरवणारी.