Skip to product information
1 of 2

Payal Book

Amrutvarshini by pushpalata kadhe

Regular price Rs. 540.00
Regular price Rs. 600.00 Sale price Rs. 540.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication

श्री ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे की ज्याची मोहिनी शतकानुशतके जनमानसात राहिलेली आहे. पुष्पलता कढे या खरंतर सायन्स व संशोधन क्षेत्रातली व्यक्ती असूनही त्यांनी केलेला हा भावानुवाद म्हणजे सरस्वती मातेचे सुंदर वस्त्रालंकारांनी नटलेले रूप आहे असे म्हटले, तर अतिशयोक्ती होणार नाही. ईश्वराने स्फुरण रूपाने दिलेला हा प्रसन्न आनंद ज्ञानेश्वरी माऊलीच्या स्वरुपात सहज सुंदरतेने आपल्यापर्यंत पोहोचतो, ‘ओवीला ओवी’ अशा सुबद्ध पद्धतीने ही काव्यरचना केलेली आहे, ओवीसंख्या मर्यादित ठेवूनही विवरणाला पुरेसा न्याय दिला गेला आहे, प्रवाही काव्यानुवाद हे ह्या ग्रंथाचे अजून एक वैशिष्ट. गीतेचे १८ अध्याय प्रकृतात ज्ञानेश्वरीने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले, त्याच निर्मल भावनेने ज्ञानदेवांनीच लेखणीत शिरून हा काव्यनुवादात ज्ञानेश्वरी माझ्याकडून लिहून घेतली अशी त्यांची श्रद्धा आहे आणि त्याचा प्रत्यय हा भावानुवाद वाचताना सामान्य वाचकाला येत राहतो.