Payal Book
Amha Ghari Dhan | आम्हा घरी धन by विनोद शिरसाठ | Vinod Shirsath
Couldn't load pickup availability
महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने १९९४ पासून मराठी साहित्य पुरस्कार, तर १९९६ पासून महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार दर वर्षी दिले जातात. या पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या जीवनकार्याची ओळख करून देणारी स्मरणिका किंवा विशेषांक दर वर्षी प्रसिद्ध होत आले आहेत. मात्र २०१५ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात दर वर्षी पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या मुलाखती असलेले अंक साधना साप्ताहिकाने प्रकाशित केले. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टिकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाजजीवनावर भाष्य ही चतुःसूत्री समोर ठेवून या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.
त्या पाच वर्षात साहित्य विभागात दर वर्षी चार किंवा पाच पुरस्कार दिले गेले. त्यामध्ये साहित्य जीवनगौरव, ललित ग्रंथ पुरस्कार, वैचारिक ग्रंथ पुरस्कार, अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार, नाट्यलेखन पुरस्कार आणि विशेष ग्रंथ पुरस्कार किंवा पुरस्कार अशी वर्गवारी केलेली होती. त्या पाच वर्षांतील साहित्य पुरस्कारप्राप्त सर्व म्हणजे एकूण २२ व्यक्तींच्या मुलाखतींचे संकलन असलेले हे पुस्तक आहे.
