Payal Book
America Sandrabha v swaroop ( अमेरिका : संदर्भ व स्वरूप) by by Dr. Anant. Pal. Labhasetwar
Regular price
Rs. 450.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 450.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
अमेरिकेच्या विविधांगी पैलूंवर चिकित्सक प्रकाश टाकणारं हे पुस्तक. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, तशा अमेरिकेलाही आहेत. तिचे सकारात्मक गुण-अभिव्यक्ती व वैयक्तिक स्वातंत्र्य, तंत्रज्ञानातील घोडदौड, वैज्ञानिक प्राप्तव्ये, जगाचं नेतृत्व व दोनशे पन्नास वर्षांची भांडवलशाहीवादी लोकशाही या गोष्टी सर्वपरिचित आहेत. या पुस्तकात दुस-या बाजूची मीमांसा करण्याचा लेखकानं प्रयत्न केला आहे. या समृद्ध महासत्ताक देशासमोर राजकीय दौर्बल्य, वाढता कर्जभार व आर्थिक त्रुटी, आपल्या जातीय व्यवस्थेप्रमाणे कधीही लोप न पावणारा वंशद्वेष, गगनाला भिडणारी गुन्हेगारी व त्यामुळे विश्रब्ध झालेला समाज, चीनशी स्पर्धा, पक्षपाती व अविश्वासार्ह माध्यमं आणि मोकळ्या सरहद्दीमुळे देशात घुसलेले अकुशल व अल्पशिक्षित अवैध स्थलांतरित, त्याबरोबर होणारी अमली पदार्थांची वाढती आयात आणि तद्जन्य व्यसनाधीनता असे अनेक जटिल प्रश्न या देशासमोर उभे ठाकले आहेत. या महासत्ताक राष्ट्राचं सर्वांगीण दर्शन होण्यासाठी त्यांची ओळख होणं आवश्यक आहे.

