Amachi Kahani Apali Kahani By Prajakta Avhad
ही आमची, तुमची, आपल्या सर्वांची कहाणी आहे. आपण आपल्या भूमिका, आपले व्यवसाय, आपल्या विचारसरणी वेगळ्या असू शकतील, पण एक समाज म्हणून आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा आपल्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट, सकारात्मक आणि नकारात्मक कामाचा परिणाम संपूर्ण समाजावर होत असतो.
त्यामुळे आपली कहाणी ही जेवढी आपली असते, तेवढी सगळ्या समाजाचीही असते.. मग ती छोटीशी, बिनमहत्त्वाची, किरकोळ असेल किंवा मोठी, महत्त्वपूर्ण अन् थोर असेल; पण ती समाजाच्या रचनेवर आणि धारणेवर कुठे ना कुठे परिणाम करत असते, हे मात्र नक्की!
विशिष्ट मूल्यं उराशी कवटाळून चालणाऱ्या एका सनदी अधिकाऱ्याची आणि त्याच्या कुटुंबाची वाटचाल. ही वाटचाल बाहेरून जेवढी चमकदार, ग्लॅमरस तेवढीच ती ठेचकाळवून पायांना आणि मनांना जखमी करणारीही. या वाटचालीची कहाणी म्हणजे
आमची कहाणी..आमची कहाणी…