Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Alijah Bahaddar Mahadaji Shinde by Dr P N Shinde अलिजाह बहाद्दर महादजी शिंदे डॉ. पी. एन. शिंदे

Regular price Rs. 890.00
Regular price Rs. 1,000.00 Sale price Rs. 890.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Alijah Bahaddar Mahadaji Shinde by Dr P N Shinde अलिजाह बहाद्दर महादजी शिंदे  डॉ. पी. एन. शिंदे

दिल्ली काबिज करून तेथील सार्वभौम तख्तावर बसण्याची शिवछत्रपतींची महत्वकांक्षा होती. किंबहुना ते त्यांचे ध्येयच होते. पण त्याच्या उलट त्यांचे नातू-शाहू महाराज यांचे धोरण होते. कोणत्याही परिस्थितीत मोगल बादशाहीला हात न लावता मराठ्यांनी हिंदुस्थानात आपली सत्ता चौथ व सरदेशमुखीच्या साधनांनी प्रस्थापित करावी, असे मार्गदर्शक तत्वच त्यांनी पेशवा बाजीरावास व त्या पुढच्या त्याच्या वारसदारांस घालून दिलेले होते. शाहू महाराजांनी घालून दिलेला हा दंडक ना पेशव्यांनी मोडला ना महादजींनी मोडला. महादजींचे चरित्र वाचत असता नकळत वाचकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो कि इतकी सोन्यासारखी संधी येऊनही दिल्लीच्या तख्तावर महादजी का बसले नाहीत! त्या प्रश्नाचे उत्तर आहे कि शाहू महाराजांनी मराठ्यांची मानसिकताच अशी निर्माण केलेली होती की दिल्लीच्या तख्तावर आपण बसायचे नाही. आपण बादशाहीच्या कारभारीपणावरच संतुष्ट राहावे. दिल्लीच्या तख्तावर महादजी शिंदे बसले नाहीत ही खंत मराठी माणसांच्या मनात असली, तरी त्यांचे पराक्रम व कर्तबगारी यांस तत्कालीन हिंदुस्थानात तरी तोड नव्हती.