Skip to product information
1 of 2

Payal Books

Akhercha Prayog By Dr. Bal Phondke

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
"माणसाचं भावविश्व ही मोठी अजब चीज आहे. काळाच्या ओघात माणसाचं बाह्यरूप कितीही बदललं असलं, तरी त्याच्या भावविश्वावरचा काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंचा पगडा तसाच कायम आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीतील त्याच्या प्रतिक्रियेचा उगमाचा शोध घेतल्यास तो या षड्रिपूंपाशीच येऊन थबकतो. आज प्रस्थापित झालेल्या, तसेच भविष्यात येऊ घातलेल्या विज्ञानाच्या नवनूतन आविष्कारांच्या प्रभावाखाली माणसाच्या भावविश्वात आजवर कधीही न अनुभवलेल्या आगळ्यावेगळ्या वादळांचा संचार होऊ शकतो. पण त्यांना तोंड देताना होणारी माणसाची वागणूक मात्र फारशी अनोखी असणार नाही. असूच शकणार नाही. कारण उत्क्रांतीच्या ओघात माणूस शरीरानं कितीही बदलला असला, विचारांशी संबंधित असलेलं त्याचं बौद्धिक सामर्थ्य कितीही विकसित झालेलं असलं, तरी विकारांशी नातं सांगणारं त्याचं मानसविश्व मात्र होतं तसंच आहे. विज्ञानप्रसाराचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार, तसंच इंदिरा गांधी विज्ञानपुरस्कार यांचा सन्मान लाभलेले आजचे आघाडीचे विज्ञानकथाकार डॉ. बाळ फोंडके यांच्या मनोहारी विज्ञानकथांवर त्यांच्या या भूमिकेचा छाप पडलेली नेहमीच आढळते. मनाच्या अथांग डोहात डोकावताना तुमच्या-आमच्या मनाची पकड घेणार्या फोंडके यांच्या ताज्या कथांचा हा संग्रह परत एकदा आपल्याला घेऊन जात आहे. विज्ञानाच्या आविष्कारातून उभ्या होत असलेल्या नव्या दुनियेत. "